रव्याचे आप्पे (Suji Appam)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jun 18, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

रव्याचे आप्पे

साहित्य:
 • दीड वाटी बारीक रवा
 • दीड वाटी आंबट ताक
 • २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
 • पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • अर्धा टीस्पून तिखट
 • १ टीस्पून मीठ ( चवीनुसार कमी-जास्त करू शकता.)
 • तेल
कृती:
 • रवा चाळून, ताकामध्ये साधारणपणे २ तास भिजवून ठेवावा.
 • २ तासांनी, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ व एक चमचा तेल घालून नीट हलवून घ्यावे.
 • गरज भासल्यास थोडे पाणी सुद्धा टाकावे. आप्प्याचे मिश्रण इडलीच्या पिठाइतकेच पातळ असावे.
 • मग आप्पेपात्राला तेल लावून, आप्पे सोडून दोन्ही बाजूंनी तांबूस भाजून घ्यावेत. आप्पे भाजताना आप्पेपात्रावर झाकण ठेवायला विसरू नये.
 • ह्या प्रमाणामध्ये साधारण २५-२६ आप्पे होतील.