स्वीट कॉर्न चीज कटलेट (Sweet Corn Cheese Cutlet)

 • Post by Priyanka
 • Dec 20, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

स्वीट कॉर्न चीज कटलेट

साहित्य:
 • २०० ग्रॅम स्वीट कॉर्न (गोड मका) चे दाणे,
 • पाव चमचा आले पेस्ट,
 • पाव चमचा लसूण पेस्ट,
 • पाव लिंबाचा रस,
 • १ चमचा तिखट,
 • अर्धा चमचा गरम मसाला,
 • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून,
 • ३ चमचे बेसन,
 • ४ चमचे तांदुळाचे पीठ,
 • १ अमूल बटरचा क्यूब,
 • चवीनुसार मीठ,
 • २-३ चमचे तेल.
कृती:
 • स्वीट कॉर्न चे दाणे पाणी न टाकता वाफवून घ्यावेत व मिक्सर मधून भरड फिरवून घ्यावे.
 • मग वरील सर्व पदार्थ त्यात टाकून नीट मळून घेऊन त्याचे चपटे कटलेट थापून शॅलो फ्राय करावेत.
भजी: स्वीट कॉर्नची भजी