स्वीटकॉर्न पुलाव (Sweetcorn Pulao)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jul 05, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

स्वीटकॉर्न पुलाव

साहित्य:
 • २ वाट्या बासमती आख्खा तांदूळ
 • १ वाटी स्वीटकॉर्नचे वाफवलेले दाणे
 • १ वाटी उभे चिरलेले गाजराचे तुकडे
 • अर्धी वाटी उभे चिरलेले फरसबी
 • ३-४ छोट्या हिरव्या मिरच्या
 • ४ लवंगा
 • ५-६ छोटे दालचिनी तुकडे
 • २ टीस्पून जिरे
 • ३ चमचे तेल
 • चवीनुसार मीठ
कृती:
 • तांदूळ धुवून, पाण्यामध्ये १५-२० मिनिटे भिजत ठेवावेत.
 • मग कुकर घेऊन, त्यामध्ये तेल टाकावे.
 • तेल तापले कि त्यामध्ये जिरे, दालचिनी, लवंगा टाकून २ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये गाजर फरसबी, स्वीटकॉर्नचे दाणे व मिरच्या टाकून झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवावे.
 • नंतर त्यामध्ये तांदूळ टाकून ४-५ मिनिटे परतावे.
 • मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे.
 • आणि २ ते अडीच ग्लास पाणी टाकून ४ शिट्ट्या कराव्यात.
 • हा पुलाव खूप कमी साहित्यामध्ये होतो आणि चविष्ट लागतो.