तवा पुलाव (Tawa Puloa)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 30, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

तवा पुलाव (४ माणसांसाठी)

साहित्य:
 • २ वाट्या बासमती तांदूळ,
 • अर्धी वाटी चिरलेला फ्लॉवर,
 • २ मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून,
 • २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून,
 • पाव वाटी चिरलेले फरसबी,
 • १ छोटे गाजर बारीक चौकोनी चिरून,
 • १ मध्यम आकाराची सिमला मिरची बारीक चौकोनी चिरून,
 • पाव वाटी मटारदाणे,
 • २ चमचे बटर,
 • १ चमचा तेल,
 • १ टीस्पून आले लसूण पेस्ट,
 • अर्धा टीस्पून जिरे,
 • दीड टीस्पून पावभाजी मसाला,
 • अर्धा टीस्पून मिरची पावडर,
 • मीठ चवीनुसार.
कृती:
 • तांदूळ धुवून, मीठ टाकून मोकळा भात शिजवून घ्यावा.
 • एका कढईमधे २ चमचे बटर व तेल एकत्र घेऊन तापवावे.
 • मग त्यात जिरे टाकावे.
 • जिरे तडतडल्यावर, आले लसूण पेस्ट टाकून १-२ मिनिट परतावे व त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
 • कांदा थोडा मऊ झाला कि मग चिरलेला टोमॅटो टाकून ४-५ मिनिटे परतावे.
 • मग त्यात मिरची पावडर, पावभाजी मसाला व चवीनुसार मीठ टाकून छान एकत्र करावे.
 • मग त्यात फ्लॉवर, मटारदाणे व फरसबी टाकून, झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजवावे.
 • नंतर शिमला मिरची, गाजर टाकून, फ्लेम हाय करून ३-४ मिनिटे परतावे.
 • नंतर त्यात शिजवलेला भात टाकून झाकण ठेवून ३-४ वाफ काढाव्यात व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून रायत्याबरोबर सर्व करा.
आंब्याचा भात: हापूस आंब्याचा भात
नारळीभात: नारळीभात