
Recipe coming soon in English… Please watch this space.
तिळगुळाच्या वड्या
साहित्य:
- २ वाट्या तिळाचे कूट
- २ वाट्या शेंगदाण्याचे कूट
- २ वाट्या बारीक चिरलेला गूळ
- १ टीस्पून पिठी साखर
- अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
- पाव वाटी दूध
- २ चमचे तूप
- ५-६ वेलदोडे
कृती:
- तीळ गुलाबीसर भाजून, त्याचे किंचित भरडसर कूट करून घ्यावे.
- शेंगदाणे भाजून, त्याचे सालासकट एकदम बारीक कूट करून घ्यावे.
- सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी भाजून घ्यावे.
- वरील तिन्ही पदार्थ एका पातेल्यात एकत्र करून त्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकावी.
- एका मोठ्या कढईमध्ये २ चमचे घट्ट साजूक तूप घेऊन, ते तापले कि बारीक चिरलेला गूळ घालावा.
- मंद आचेवर गूळ नीट वितळवून घ्यावा. गूळ वितळवताना चमच्याने एकसारखे हलवत राहावे.
- गूळ वितळला कि मग त्यामध्ये पिठी साखर आणि दूध घालून सर्व मिश्रण एकसारखे करून घ्यावे.
- मंद आचेवर पाक एक छोटी उकळी आणि किंचित फेस येईपर्यंत ठेवावा.
- मग गॅस बंद करून त्यामध्ये शेंगदाणे-तिळाचे मिश्रण घालून नीट एकजीव होईपर्यंत हलवून घ्यावे.
- एका ताटाला तुपाचा हात लावून गरम गरम वड्या पाडाव्यात.