टोमॅटो पनीर राईस (Tomato Paneer Rice)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

टोमॅटो पनीर राईस

साहित्य:
 • २ वाट्या तांदूळ
 • ४ मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो
 • २ मध्यम आकाराचे कांदे
 • १०० ग्रॅम पनीर
 • दीड टीस्पून आले लसूण पेस्ट
 • १ टीस्पून जिरे
 • २ इंच दालचिनीचा तुडका
 • ३ चमचे तेल
 • १ चमचा साजूक तूप
 • २ टीस्पून मीठ
 • १ टीस्पून सांबार मसाला
 • ३ सुक्या लाल मिरच्या
 • २ तमालपत्रे
 • अर्धा टीस्पून तिखट
 • पाव टीस्पून हळद
 • मूठभर कोथिंबीर
कृती:
 • तांदूळ निवडून स्वच्छ धुवून, १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे.
 • नंतर त्यामध्ये १ टीस्पून मीठ, जिरे, दालचिनीचे तुकडे, साजूक तूप व अडीच ग्लास पाणी घालून कूकरमध्ये मोकळा भात शिजवून घ्यावा.
 • भात शिजला कि गार होण्यासाठी उपसून ठेवावा.
 • भात शिजेपर्यंत टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घ्यावी.
 • पनीरचे चौकोनी तुकडे करून, पॅनमध्ये १ चमचा तेल घालून गुलाबीसर तळून घ्यावे.
 • मग एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून ते गरम झाले कि त्यामध्ये तमालपत्र, सुक्या मिरच्या व बारीक चिरलेला कांदा घालावा.
 • कांदा परतून गुलाबी झाला कि त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, टोमॅटोची प्युरी, तिखट, हळद, मीठ, सांबार मसाला व तळलेले पनीरचे तुकडे घालावेत.
 • व झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.
 • नंतर त्यामध्ये शिजलेला भात घालून नीट मिसळून घ्यावा.
 • आणि झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात.
 • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून टोमॅटो पनीर राईस गरम गरम सर्व्ह करावा.