व्हॅनिला कपकेक (Vanilla Cupcake)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

व्हॅनिला कपकेक

साहित्य:
 • १ वाटी बारीक रवा
 • १/४ वाटी साखर
 • १/४ वाटी दही (जास्त आंबट नको)
 • ३/४ वाटी दूध
 • ४ थेंब व्हॅनिला इसेन्स
 • १ टीस्पून बेकिंग पावडर
 • १/२ टीस्पून बेकिंग सोडा
 • २ टीस्पून लिंबाचा रस
 • ३ चमचे रिफाईंड तेल
 • टूटीफ्रूटी
कृती:
 • रवा, दही, दूध आणि साखर घेऊन मिक्सरमध्ये ४५-५० सेकंद बारीक फिरवून घ्यावे.
 • हे मिश्रण १५-२० मिनिटे तसेच मिक्सरच्या भांड्यात मुरण्यासाठी ठेवावे.
 • तोपर्यंत कढईच्या तळाशी मीठ पसरवून घेऊन त्यावर एक ताटली ठेवावी. आणि कढई झाकण ठेवून गरम करायला ठेवावी.
 • ५ -६ वाट्या घेऊन त्याला आतून नीट तुपाचा हात फिरवून ठेवावा.
 • १५ मिनिटांनी मिक्सरमधील मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पसरवून घालावे.
 • बेकिंग सोड्यावर लिंबाचा रस पसरवून टाकावा. तो छान फसफसतो.
 • मग वरून ३ चमचे तेल घालून, हे मिश्रण १० सेकंद मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
 • सर्व मिश्रण नीट एकजीव झाले पाहिजे, परंतु जास्त वेळ मिक्सर फिरवू नये.
 • मग हे मिश्रण वाट्यांमध्ये (साधारणपणे अर्धी वाटी) ओतून, वरून थोडे थोडे टूटीफ्रूटी घालावे.
 • वाट्या तापत ठेवलेल्या कढईमध्ये ठेवाव्या आणि वरून घट्ट झाकण ठेवावे. गॅसची ज्योत मंद ठेवावी.
 • साधारणपणे ३०-३५ मिनिटामध्ये केक तयार होतील.
 • हे केक खूप हलके होतात आणि रव्याचे असल्यामुळे पौष्टीकसुद्धा आहेत.