व्हॅनिला स्पॉंज केक (Vanilla Sponge Cake)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

व्हॅनिला स्पॉंज केक

साहित्य:
 • सव्वा वाटी मैदा
 • पाऊण वाटी पिठी साखर
 • ३ चमचे रिफाईंड तेल
 • अर्धी वाटी गोड दही
 • अर्धी वाटी दूध
 • ४-५ थेंब व्हॅनिला इसेन्स
 • पाऊण टीस्पून बेकिंग पावडर
 • पाव टीस्पून बेकिंग सोडा
 • टूटीफ्रूटी (ऐच्छिक)
कृती:
 • एका वाटीमध्ये साधारणपणे मूठभर टूटीफ्रूटी घेऊन, त्यामध्ये १ टीस्पून मैदा टाकून नीट मिक्स करून ठेवावे.
 • कढई घेऊन त्याच्या तळाशी मिठाचा एक थर देऊन, ती एकदम मंद आचेवर गरम करत ठेवावी. कढईवर जड झाकण ठेवावे.
 • केकचे भांडे घेऊन त्याला आतून नीट तुपाचा हात लावून त्यावर मैदा भुरभुरावा आणि टिचक्या मारत नीट पसरवून घ्यावा.
 • एका पातेल्यामध्ये तेल व दही घेऊन नीट मिक्स करून घ्यावे.
 • मग त्यामध्ये पिठीसाखर घालून जोरजोरात फेटून घ्यावे.
 • मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले कि त्यामध्ये दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून जोरात फेटावे. जितके जास्त फेटू तितका केक हलका होतो.
 • मग ह्या मिश्रणात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घालावे. व हलक्या हाताने नीट फेटून घ्यावे.
 • नंतर टूटीफ्रूटी घालून परत हलक्या हाताने नीट फेटून घ्यावे.
 • मग हे मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून, ते भांडे कढईमध्ये ठेवून वरून जड झाकण ठेवावे.
 • मंद आचेवर साधारणपणे ५० मिनिटे केक बेक करावा.
 • हा एकदम साधा सोपा केक, घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण तयार करू शकतो. आणि तरीही खूप हलका आणि चविष्ट होतो.
comments powered by Disqus
TAG