व्हेज बिर्याणी (Veg Biryani)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Mar 01, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

व्हेज बिर्याणी

साहित्य:
 • २ वाट्या आख्खा बासमती तांदूळ
 • १ चमचा साजूक तूप
 • ३-४ लवंगा
 • ३-४ दालचिनीचे तुकडे
 • ३-४ वेलदोडे
 • २ चक्रीफुलं
 • १ टीस्पून जिरे
 • २ तमालपत्रं
 • १ वाटी फ्लॉवरचे तुरे
 • अर्धी वाटी मटारदाणे
 • पाव वाटी गाजराचे चौकोनी तुकडे
 • अर्धी वाटी दही
 • १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
 • १ मोठा कांदा बारीक चिरून, १ मध्यम कांद्याच्या चकत्या
 • १ वाटी पनीरचे चौकोनी तुकडे
 • १ टीस्पून आले लसूण पेस्ट
 • १ टीस्पून तिखट
 • १ टीस्पून बिर्याणी मसाला
 • अर्धा टीस्पून हळद
 • २ टीस्पून मीठ
 • ३ चमचे तेल
 • अर्धी वाटी चिरलेला पुदिना
 • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
कृती:
 • तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे.
 • अर्ध्या तासाने त्यामध्ये १ टीस्पून मीठ, साजूक तूप, जिरे, दालचिनी, लवंग, तमालपत्र, चक्रीफूल, वेलदोडा घालून, व तांदूळ भिजेल इतकेच पाणी घालून कूकरमध्ये ३ शिट्ट्या करून अर्धा कच्चा भात शिजवून घेणे.
 • भाताबरोबरच दुसऱ्या एका भांड्यात पाणी न घालता फ्लॉवर, मटार, गाजर ह्या भाज्या सुद्धा वाफवून घ्याव्यात.
 • भात शिजला कि गार होण्यासाठी एका ताटामध्ये उपसून ठेवावा.
 • एका पॅन मध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा तांबूस परतून घेऊन बाजूला काढावा.
 • मग त्यातच पनीर गुलाबीसर परतून घेऊन बाजूला काढून ठेवावे.
 • एका कढईमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यामध्ये आले लसूण पेस्ट २ मिनिटे परतून घ्यावी.
 • मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून मऊ व गुलाबीसर परतून घ्यावा.
 • नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजवावे.
 • टोमॅटोला पाणी सुटले कि त्यामध्ये १ टीस्पून मीठ, तिखट, हळद, बिर्याणी मसाला टाकून चांगले हलवून घ्यावे.
 • मग त्यामध्ये दही टाकून एकसारखे हलवत राहावे.
 • त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या व पनीर चे थोडे तुकडे टाकून नीट हलवून घ्यावे.
 • त्यावर चिरलेली कोथिंबीर, पुदिना व तळलेला कांदा टाकावा.
 • मग शिजवलेला भात टाकून त्यावर पुन्हा तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना टाकावा.
 • मग राहिलेले पनीरचे तुकडे टाकून त्यावर परत तळलेला कांदा, पुदिना व कोथिंबीर टाकावे.
 • नंतर त्यावर घट्ट बसेल असे झाकण ठेवून बिर्याणी १० मिनिटे शिजवावी. बिर्याणी शिजवताना हलवू नये.