व्हेज चीझ रोल (Veg Cheese Roll)

post-thumb

Recipe coming soon in English… Please watch this space.

व्हेज चीझ रोल

सारणासाठी साहित्य:
 • १ वाटी लांब चिरलेले फरसबी,
 • १ वाटी उभे चिरलेले गाजर,
 • १ छोटी सिमला मिरची उभी चिरून,
 • १ वाटी उभा चिरलेला कांदा,
 • अर्धी वाटी उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे,
 • अर्धा टीस्पून तिखट,
 • पाव टीस्पून ओरिगॅनो,
 • पाव टीस्पून मिक्स्ड हर्ब्स,
 • २ टेबलस्पून तेल,
 • अर्धी वाटी खिसलेले चीझ,
 • चवीनुसार मीठ,
 • मेयोनीज
सारणासाठी साहित्य:
 • तीन वाट्या कणिक,
 • दीड टेबलस्पून तेल,
 • अर्धा टीस्पून मीठ.
कृती:
 • कणिक घेऊन त्यात तेल व मीठ टाकून बऱ्यापैकी घट्ट मळून झाकून ठेवावी.

 • मग एका पसरट कढईमधे तेल टाकून त्यात फारसबीचे तुकडे टाकून छान फ्राय करावेत.

 • साधारण १० मिनिटे लागतात.

 • नंतर त्यात गाजराचे तुकडे टाकून ५ मिनिटे परतून घ्यावे.

 • मग त्यात कांदा व सिमला मिरची टाकून झाकण ठेवून हाय फ्लेम वर ३-४ मिनिटे सर्व शिजवावे.

 • नंतर गॅस बारीक करून त्यात ओरिगॅनो, मिक्स्ड हर्ब्स, तिखट, मीठ व स्वीटकॉर्न चे दाणे टाकून नीट हलवून घ्यावे.

 • नंतर चीझ टाकून सर्व मिश्रण एकजीव होईल असे हलवून गॅस बंद करावा.

 • नंतर कणकेच्या फुलक्यासारख्या पोळ्या लाटून दोन्ही बाजूनी अर्धवट भाजून घ्याव्या.

 • मग एकेक पोळी घेऊन त्यात मध्यभागी सारण भरून त्यावर मेयोनिज टाकावे.

 • व घट्ट रोल करून तव्यावर लो फ्लेम वर तेल किंवा बटर सोडून खरपूस भाजून घ्यावा.

टीप: सरणातील भाज्या फार मऊ शिजवू नये. खाताना थोड्या crunchy लागल्या पाहिजेत.