व्हेज मोमोज (Veg Momos)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Dec 20, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

व्हेज मोमोज

साहित्य: (१०-१२ मोमोज साठी)

सारणासाठी:

 • १ चमचा तेल,
 • २ बिया काढून बारीक चिरलेल्या मिरच्या,
 • १ इंच लांबीचा आल्याचा तुकडा किसून,
 • पाव किलो कोबी,
 • १ छोटे गाजर,
 • १ चिमूट मिरेपूड,
 • चवीनुसार मीठ.

आवरणासाठी:

 • १ वाटी मैदा,
 • अर्धा चमचा तेल,
 • पाव टीस्पून मीठ.
कृती:
 • प्रथम मैद्यामध्ये मीठ घालून घट्ट मळून घ्यावे. व वरून तेल लावून २० मिनिटे झाकून ठेवावे.
 • कढईमधे १ चमचा तेल टाकून, तेल तापल्यावर त्यात किसलेले आले, मिरची, मिरपूड, किसलेला कोबी, किसलेले गाजर व मीठ घालून २-४ मिनिटे परतावे.
 • कूकर मध्ये एक पातेले ठेवून त्यात पाणी घालावे.
 • आणि मग हे पाणी उकळेपर्यंत कूकरचे झाकण बंद करून शिट्टी न लावता गॅस वर ठेवावे.
 • तोपर्यंत मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून झाकून ठेवावे.
 • मग एक एक गोळा घेऊन पातळ पुरी लाटून, त्यात सारण भरून मोमो तयार करावे व ओल्या फडक्याने झाकून ठेवावे.
 • पुरी लाटताना मैदा भुरभुरत लाटावी, म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही.
 • कूकर मधील पाणी उकळल्यावर, एका चाळणीला तेल लावून त्यात मोमो ठेवून, ती चाळणी कूकरमधील पातेल्यावर ठेवून १० मिनिटे हाय फ्लेमवर मोमोज उकडणे.
 • तेलकट रंग आल्यावर मोमोज बाहेर काढून चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

टीप: उकडल्यावर मोमोज खूप फुगतात.

चटणी: मोमो साठी चटणी